Monday, April 2, 2012

ताजमहल





एक  शहनशाह  ने  बनवा  के  हसीं  ताजमहल
सारी  दुनिया  को  मुहब्बत  की  निशानी  दी  है
इसके  साए  में  सदा  प्यार  के  चर्चे  होंगे
ख़त्म  जो  हो  ना  सकेगी  वो  कहानी  दी  है
एक  शहनशाह  ने  बनवाके ...

ताज  वो  शम्मा  है  उल्फत  के  सनम  खाने  की
जिसके  परवानो  में  मुफलिस  भी  ज़रदार  भी है
संग -ए-मरमर  में  समाए  हुए  ख़्वाबों  की  क़सम
मरहले  प्यार  के  आसान  भी  दुश्वार  भी  हैं
दिल  को  एक  जोश  इरादों  को  जवानी  दी  है
एक  शहनशाह  ने  बनवाके ...

ताज  इक  ज़िंदा  तसव्वुर  है  किसी  शायर  का
इसका  अफसाना  हकीकत  के  सिवा  कुछ  भी  नही
इसके  आगोश  में  आकर  ये  गुमान  होता  है
ज़िंदगी  जैसे  मुहब्बत  के  सिवा  कुछ  भी  नहीं
ताज  ने  प्यार  की  मौजों  को  रवानी  दी  है
एक  शहनशाह  ने  बनवाके ...


ये  हसीं  रात  ये  महकी  हुई  पुरनूर  फ़ज़ा
हो  इजाज़त  तो  ये  दिल  इश्क  का  इज़हार  करे
इश्क  इंसान  को  इंसान  बना  देता   है
किसकी  हिम्मत  है  मुहब्बत  से  जो  इनकार  करे
आज  तकदीर  ने  ये  रात  सुहानी  दी  है
एक  शहनशाह  ने  बनवाके ......

लहानपणापासूनच घरात साहित्यिक आणि सांगीतिक वातावरण असल्याकारणाने एखादी बंदिश किंवा एखादे गाणं ऐकले की त्याच्या स्वराभ्यासासोबतच त्या बंदिशिमध्ये किंवा त्या गाण्यात काय म्हंटले आहे, अर्थ काय आहे या सगळ्याचा आभ्यास करण्याची सवयच होती. त्यावेळी आणि गाणे म्हणून आजही आवडणारे एक  म्हणजे "लिडर " या सिनेमातील रफिने गायलेले " एक शहनशाह ने बनवाके हसीं ताजमहल  " शकील ने लिहिलेले  ..राग ललित मध्ये बांधलेले हे अतिशय सुरेल आणि सुरेख गाणे . हे गाणे म्हणजे ताजमहल चे वर्णन च आहे .. ताज कसा प्रेमाचे प्रतिक आहे वगैरे वगैरे.. शहनशाह ने त्याच्या प्रिय मुमताज़ च्या प्रेमाखातर तिच्या आठवणीसाठी बांधून घेतला. आणि त्या करागिराना बक्षिस म्हणून शहनशाह ने काय दिले हे तर जगजाहिरच आहे!  आणि या गोष्टीचा विचार करता असा प्रश्न  येतो  की तेव्हापासूनच आपल्याकडे कलाकाराला स्वातंत्र्य नाहिचे का? कलाकाराने त्याची अभिव्यक्ति जपायची नाहीच का? 

आणि हा विचार करत असतानाच माझ्या  हातात "मितवा" पडले ग्रेस चे मितवा .. ..आणि माझ्या या विचारांशी साधर्म्य सांगणाराच एक परिच्छेद मला मिळाला..


"ताजमहाल सुंदर आहे हे मला माहीत आहे. पण आग्र्याला गेलो तरीही मी ताजमहाल बघणार नाही इतके निवडस्वातंत्र्य मी स्वतःपाशी राखू इच्छितो, राखू शकतोही. प्रत्येक सुंदर वस्तू बघावीशी वाटतेच असे नाही, आपलीशी करावीशी वाटते असेही नाही. कारण सौंदर्याभोवती संदिग्ध वास्तवाची अस्ताचलीन आरास विखुरलेली असते. हे विखुरलेले तुकडे एक एक करुन ओंजळीत जमा करायचे. हे सौंदर्याचे संदर्भ नव्हेत, सौंदर्याचे अध्याह्रुत. ताजमहाल ही वास्तू एका दुःखवैभवी राणीची कबर आहे एवढ्या माहितीने या वास्तूची संपूर्ण अस्ताचलीन आरास कशी सापडेल? त्यासाठी शहाजहानचे डोळे भोगायला हवेत, नजर आजमावयला हवी. मला माऴ्य अकलंकित आणि अलौकिक भासचक्रात हे शक्य होऊ शकते.


शहाजहानसारख्या भोग-दुर्भोगसंपन्न सम्राटाने ताजमहालच्या कारागिरांचे आंगठे कसे काय कापून घेतले असतील? हे सत्य की वास्तव की आणखी काही?असे का व्हावे? याच प्रश्नांशी टक्कर घेताना मला ख्रिस्ताच्या देहावरील खिळे आणि ख्रिस्तकरुणा यांचेही संबंध जटील करणारे प्रश्न पडले होते.....एकातून एक असंख्य पेच निर्माण होत जाणे हे माझ्याच विचारप्रक्रियेचे अटळ प्राक्तन आहे. शहाजहान ने कलावंतांचे आंगठे कापुन घेतले असतील तर या कॄत्याला मी कधीच क्षमा करु शकणार नाही. सम्राटाच्या सौंदर्यासक्तीचा आदर करणे ही मला कठीणच. एखाद्या कलावंताने, आपली निर्माणक्षमता संपल्याच्य विदारक जाणिवेने स्वतःचा आंगठा कापून टाकावा, विसर्जित करावा हे मी समजू शकतो. पण कलावंताचा आंगठा ही कोणाही सम्राटाचा मालकी हक्क कसा होईल? कलावंताची कलासक्त बांधिलकी ही कुठल्याच सत्तेची गुलामगिरी कधीच होऊ शकत नाही. तरीही हे होतेच. ख्रिस्तकरुणेला समाजसत्तेचे खिळे आणि सॄजनात्मकतेला आंगठा कापण्य़ाचा शह! एकलव्याचा आंगठाही असाच एक हिंस्त्र सत्तेचा बळी. अशा लहानथोर सत्ता सतत आंधळी सत्ता गाजवत असतात. म्हणूनच कलावंतांच्या बांधिलकीचा प्रश्न अटीतटीचा होऊन बसतो. आणि मला वाटते इथेच रसिकांच्या बांधिलकीचाही प्रश्न यायला हवा. मला रसिकांचा अनादर अजिबात करायचा नाही पण त्यांचाही स्वतःचा असा एक पिंडधर्म तयार व्हायला हवा इतकेच नम्रपणे सुचवायचे आहे. अभिरुचीलाही बांधिलकी हवी. विशिष्ट स्तर हवा, दिशाही हवी.दहा प्रकारच्या गोष्टी आवडणे शक्य आहे, पण त्यातही  आत्म्याला खंजिरासारखी भेदून जाणारी एखादी असतेच ना! दिशाहीन विदग्धतेच्या हव्यासाने आज सगळीकडे अभिरुचीचे अवमूल्यन होते आहे.
अंधारात फार संयमाने दिवा ठेवाव लागतो.. ही ओळ काय मी केवळ एखाद्या लहरी थिल्लर तिडिकीत लिहिली असेल? दिव्याची जपणूक आणि अंधाराची बूज राखतो मी. संवेदना रक्तबंबाळ झाल्या तरीही माझे इमान ढळत नाही - माझ्यापुरते.एक दिवा असा जपायचा तर अयुष्य पुरत नाही मला आणि इथे तर झुंबरेच्या झुंबरे शोभेला लावण्याची अहमहमिका सुरु आहे! ही संयमशून्यता नव्हे तर दुसरे काय?"



ग्रेस ला वाचल्यानंतर ताजमहल त्याहीपेक्षा शहनशाह बद्दल एक तिडिक बसली होती आणि त्यालाच पोषक असा साहिर भेटला .. तल्खियाँ मधून त्याच्या  साहिर ने अगदी लाजवाब पणे तल्खिया मध्ये एक नज़्म आपण कविताच म्हणू तिला  हवेतर पेश केली आहे ..

ताज तेरे लिये इक मज़हर-ए-उल्फ़त ही सही
तुझको इस वादी-ए-रंगीं से अक़ीदत ही सही

मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से! 

बज़्म-ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या मानी
 सब्त जिस राह में हों सतवत-ए-शाही के निशाँ 
उस पे उल्फ़त भरी रूहों का सफ़र क्या मानी 

मेरी महबूब! पस-ए-पर्दा-ए-तशहीर-ए-वफ़ा  

तू ने सतवत के निशानों को तो देखा होता 
मुर्दा शाहों के मक़ाबिर से बहलने वाली 
अपने तारीक मकानों को तो देखा होता

अनगिनत लोगों ने दुनिया में मुहब्बत की है 
कौन कहता है कि सादिक़ न थे जज़्बे उनके 
लेकिन उन के लिये तशहीर का सामान नहीं 
क्योंकि वो लोग भी अपनी ही तरह मुफ़लिस थे 

ये इमारात-ओ-मक़ाबिर, ये फ़सीलें ये हिसार
मुतल-क़ुलहुक्म शहंशाहों की अज़मत के सुतूँ 
सीना-ए-दहर के नासूर हैं ,कुहना नासूर
जज़्ब है जिसमें तेरे और मेरे अजदाद का ख़ूँ 

मेरी महबूब ! उन्हें भी तो मुहब्बत होगी 
जिनकी सन्नाई ने बख़्शी है इसे शक्ल-ए-जमील 
उन के प्यारों के मक़ाबिर रहे बेनाम-ओ-नमूद 
आज तक उन पे जलाई न किसी ने क़ंदील  

ये चमनज़ार ये जमुना का किनारा
ये महल ये मुनक़्क़श दर-ओ-दीवार, ये महराब ये ताक़ 

इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर 
हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़

मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से! 
--------------------------------------- साहिर

पण माझ्यासाठी "आग्र्याला गेले  तरीही मी ताजमहाल बघणार नाही इतके निवडस्वातंत्र्य मी स्वतःपाशी राखू इच्छिते "